• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली
0
SHARES
81
VIEWS
Ad 1

आजरा : प्रतिनिधी

मुंबईहून गावी आलेल्या दाम्पत्याची मौल्यवान दागिने आणि रोकड असलेली बॅग आजरा पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत सुखरूप मिळून आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

घटना अशी घडली

मुंबई येथे वास्तव्यास असलेले धनाजी बाबूराव कांबळे आणि त्यांची पत्नी संगीता कांबळे हे आपल्या मूळ गावी पेरनोली (ता. आजरा) येथे येण्यासाठी रविवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल्सने आजरा येथे उतरले. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या सहा बॅगांपैकी एक बॅग हरवल्याचे लक्षात आले.

हरवलेल्या बॅगेमध्ये तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत कांबळे दाम्पत्याने आजरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने सुरू केला शोध

सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजद यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रॅव्हल्सचा नंबर, वेळ आणि उतरलेले ठिकाण याची माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार समीर कांबळे आणि पोलीस कर्मचारी वैभव गवळी यांना तातडीने शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले.

आजरा शहरातील मुख्य चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना एका दुकानाबाहेर सदर बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. तपासाअंती हा चोरीचा प्रकार नसून प्रवासातील गडबडीत बॅग तिथेच राहिल्याचे स्पष्ट झाले.

मौल्यवान ऐवज सुखरूप परत

पोलिसांनी बॅगेतील १५ तोळे सोने आणि १ लाख रुपयांची रोकड याची खात्री करून बॅग संगीता कांबळे यांच्या ताब्यात दिली. हरवलेली मौल्यवान बॅग सुखरूप मिळाल्याने कांबळे दाम्पत्य भावूक झाले आणि त्यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल बलु, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत सपोनि शितलकुमार डोईजद, पीएसआय संजय पाटील, समीर कांबळे, सतीश जंगम, अनिल सरंबळे, वैभव गवळी आणि दिपाली खडके यांनी सहभाग घेतला.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

नामखोल येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण

Next Post

ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
4
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
0
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
42
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In