कुरुंदवाड : प्रतिनिधी
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) बोर्ड परीक्षेत कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत 97.12 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 174 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 169 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 55 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 59 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 47 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 8 विद्यार्थ्यांनी पास श्रेणीत यश मिळवले.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
- प्रथम क्रमांक : कु. सिद्धी सारंग चव्हाण – 95.20%
- द्वितीय क्रमांक : कु. श्रावणी महावीर मगदूम – 94.80%
- तृतीय क्रमांक : कु. प्रांजली प्रमोद कांबळे
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. किरण पाटील सर, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रावसाहेब उर्फ दा. आ. पाटील, सचिव श्री. अजित पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभल्यामुळे हे यश संपादन करता आल्याची भावना विद्यालयाकडून व्यक्त करण्यात आली.







