• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

– पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

बोर नदीवरील पूरसंरक्षण भिंतीचे भूमिपूजन
सेलू येथे तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

वर्धा, दि. ९ (जिमाका) : शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत थेट पोहोचावा यासाठी जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

सेलू तालुका प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वतीने सेलू येथील शिवमंदिर परिसरात आयोजित जनसंवाद कार्यक्रम तसेच आपत्ती व्यवस्थापन व सौंदर्यीकरण अंतर्गत बोर नदीवरील पाच गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार रामदास तडस, सेलू नगर पंचायत अध्यक्षा स्नेहल देवतारे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अशोक मुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अशोक कलोडे, ज्योती घंगारे, दामिनी डेकाटे, तहसीलदार शकुंतला पाराजे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, जनसंवादाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असून नागरिकांच्या समस्या आणि अडचणींचे निराकरण करण्यात मदत होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा पंचायत समितीशी थेट संबंध येत असल्याने जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीऐवजी नवीन पंचायत समिती इमारत उभारण्यात आली आहे. तसेच तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका कृषी कार्यालयाच्या नवीन इमारतींनाही मंजुरी मिळाली असून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सेलू येथे ४५ कोटी रुपयांच्या खर्चातून तालुका न्यायालय उभारण्यात येणार असून ‘नमो उद्यान’ निर्मितीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वर्धा येथे १०० एकर जागेवर नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्धा आणि सेलू तालुक्याला पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोर आणि धाम प्रकल्पाचा मोठा लाभ होत असून या प्रकल्पांच्या कालव्यांच्या दुरुस्ती, क्षमता वाढ आणि नूतनीकरणासाठी प्रत्येकी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बोर नदीवरील ब्राम्हणी, घोराड, सेलू, बेलगाव आणि देरडा येथे पूरसंरक्षण भिंती उभारण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यात नदीकाठच्या गावांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

माजी खासदार रामदास तडस यांनी जनसंवाद हा शासनाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे मत व्यक्त केले. स्नेहल देवतारे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ब्राम्हणी, घोराड, सेलू, बेलगाव आणि देरडा येथे सुमारे ५ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतींचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी आणि निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी महसूल, कृषी, वन, आदिवासी विकास, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Tags: Shankar Panbude
Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

Next Post

आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामांना गती मिळणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामांना गती मिळणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामांना गती मिळणार - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In