• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामांना गती मिळणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामांना गती मिळणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

सावंगी (मेघे) येथे ३ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

२२ स्वतंत्र सेवा केंद्र इमारतींसाठी ४.३२ कोटींची तरतूद

वर्धा, दि. १० :
ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शक व जलद पद्धतीने मिळावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदे, ग्रामपंचायत प्रशासक संजय होटे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल जुमडे, माजी सरपंच सरिता दौड, माजी उपसरपंच विलास दौड, पालोतीचे सरपंच श्री. खंडागळे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, विशेष कार्यकारी अधिकारी राजू थुल आदी उपस्थित होते.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन अर्ज व शासकीय सेवा मिळवण्यासाठी शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या स्वतंत्र इमारती उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून नागरिकांची विविध कामे अधिक सुलभ आणि वेगाने मार्गी लागतील.

यावेळी त्यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात एकूण २२ सुसज्ज सेवा केंद्र इमारतींसाठी ४ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीने सर्वप्रथम इमारतीचे काम पूर्ण करून लोकार्पण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सावंगी जिल्हा परिषद शाळेची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड झाल्याची घोषणाही त्यांनी केली.

कार्यक्रमात ग्रामपंचायत भवन, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारत, सिमेंट रस्ते तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी ग्रामपंचायत प्रशासक संजय होटे व ग्रामपंचायत अधिकारी राहुल जुमडे यांनी पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक माजी उपसरपंच विलास दौड यांनी केले.

यानंतर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध समस्यांबाबत निवेदने स्वीकारली. प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२२ गावांमध्ये उभारल्या जाणार सेवा केंद्र इमारती

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारती उभारण्यात येणार आहेत. वर्धा तालुक्यातील नालवाडी, उमरी (मेघे), साटोडा, पवनार, आंजी (मो), पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), सालोड (हि), म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी), सेवाग्राम, सेलू तालुक्यातील घोराड, केळझर, हिंगणी, देवळी तालुक्यातील नाचणगाव व गुंजखेडा, हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर व वडनेर तसेच समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावांचा यामध्ये समावेश आहे.

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार

Next Post

किनवट येथे मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
4
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
6
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
9
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post
किनवट येथे मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

किनवट येथे मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In