• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तीर्थक्षेत्र माहूरमध्ये “मागेल त्याला मोफत पाणी टँकर” उपक्रम ठरतोय जीवनदायी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
तीर्थक्षेत्र माहूरमध्ये “मागेल त्याला मोफत पाणी टँकर” उपक्रम ठरतोय जीवनदायी
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी):
तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या माहूर शहरात दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच माहूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचीही शहरात सतत वर्दळ असते. दरवर्षी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना “जय जंगो रायताड प्रतिष्ठान”च्या माध्यमातून राबविण्यात येणारा “मागेल त्याला मोफत पाणी टँकर” हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.

आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून, मागील तीन वर्षांपासून तो अखंडपणे सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये दररोज सुमारे २० ते २५ घरांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर आवश्यक प्रसंगीही नागरिकांना तात्काळ टँकर सेवा उपलब्ध करून दिली जाते.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

यासोबतच माहूर बस स्थानकासमोर थंडगार आरओचे शुद्ध पाणी सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातून येणारे नागरिक, प्रवासी तसेच दर्शनासाठी येणारे भाविक यांना या सुविधेचा मोठा लाभ होत असून, उन्हाळ्याच्या दिवसांत ही सेवा अनेकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना गोपू महामुने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“मीसुद्धा या शहराचा एक नागरिक आहे. या शहराने मला खूप काही दिले असून, या शहराचे काही उपकार फेडण्याची भावना माझ्या मनात आहे. अशा पवित्र देवस्थानच्या ठिकाणी राहण्याचे मी माझे भाग्य समजतो. समाजासाठी काहीतरी उपयोगी कार्य करावे या भावनेतूनच मी ही मोफत सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामागे कोणताही स्वार्थ नसून समाजाचे काही देणे लागतो, एवढीच भावना मनात आहे.”

गोपू महामुने यांच्या या समाजाभिमुख कार्यात सहकारी निलेश तायडे यांचेही मोलाचे योगदान असून, त्यांच्या सहकार्यामुळे ही सेवा सुरळीतपणे सुरू आहे. गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेने मदत केली जात असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे.

माहूरसारख्या धार्मिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

Next Post

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In