• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

कुरुंदवाड :
माळभाग येथील महाराणा प्रताप चौकात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. कुरुंदवाड यांच्या गेटला अडकवलेली भारतीय डाक विभागाची जुनी टपाल पेटी आजही अस्तित्व टिकवून उभी असली, तरी तिची अवस्था “असून नसल्यासारखी” झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल आणि AI च्या आधुनिक युगात पत्रव्यवहाराची जागा डिजिटल माध्यमांनी घेतल्याने पारंपरिक टपाल सेवेकडे नागरिकांचा ओढा कमी झाला आहे. एकेकाळी “शांतीदूत” म्हणून गौरवली जाणारी पोस्ट सेवा आज केवळ मुख्य पोस्ट ऑफिसपुरती मर्यादित राहिल्याचे दिसत आहे.

कुरुंदवाडमधील महावितरण कार्यालयाच्या गेटसमोर लोखंडी खांबाला लटकवलेली ही टपाल पेटी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे. नागरिक तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर अनेक दिवसांनी पोस्टमन पेटी उघडण्यासाठी आला असता, कुलूपाची चावीही व्यवस्थित लागत नसल्याचे दिसून आले. उन्हाळा आणि पावसाळ्याचा मार सहन करत पेटीचे कुलूपही गंजलेल्या अवस्थेत आहे.

स्थानिक नागरिकांनी भारतीय डाक विभागाकडे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. टपाल पेटीची दुरुस्ती करून तिला रंगरंगोटी करावी, नवीन कुलूप बसवावे तसेच नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी व्यवस्थित बसवावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा टपाल सेवेचा वापर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अन्यथा ही टपाल पेटी वर्षानुवर्षे गंजत राहून अखेर अस्तित्वातून नाहीशी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी…” अशी भावना आता अनेक जुन्या नागरिकांच्या मनात व्यक्त होताना दिसत आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

Next Post

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
41
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
24
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
8
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
20
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
141
Next Post
बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In