• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध दारू विक्रीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
अवैध दारू विक्रीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

सावंगी (मेघे) पोलीसांनी अवैध दारू विक्रीविरोधात धडक कारवाई करत ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ईंजापूर येथील ‘कशीश रेस्टॉरंट’वर करण्यात आली.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, वर्धा ते वायगाव (निपाणी) रोडलगत असलेल्या कशीश रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असून ग्राहकांना बसून मद्यपान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता, शंकर दानानी हा पोलीस आल्याची चाहूल लागताच मागील दरवाजाने पसार झाला. पंचांसमक्ष हॉटेलची तपासणी केली असता एका खोलीत प्लास्टिक टेबल-खुर्च्यांवर बसून ग्राहक मद्यपान करताना आढळले.

यावेळी पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला :

  • ऑफीसर चॉईस कंपनीच्या १८० एमएलच्या १२ विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या
  • किंगफिशर कंपनीच्या ५०० एमएलच्या २ बिअर कॅन
  • ३ स्टील ग्लास
  • ४ प्लास्टिक खुर्च्या
  • २ प्लास्टिक टेबल
  • एक जुना फ्रीज

असा एकूण ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी :

  1. शंकर दानानी (रा. पोद्दार बगीचा, रामनगर, वर्धा – पसार)
  2. राहुल अरुणराव बोरले (वय ३८, रा. ईंजापूर)
  3. सुनील देवेंद्रकुमार बहल (वय ४४, रा. रामनगर, वर्धा)
  4. प्रविण चिंधुजी कांबळे (वय ४४, रा. समतानगर, वर्धा)

यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे, पोशी शाम सलामे, पोशी गौरव नरताम आणि मपोशी अंजली गाडेकर यांच्या पथकाने केली.

Previous Post

देसाईगंज-कुरखेडा महामार्गावरील खड्ड्यांची आमदार रामदास मसराम यांच्याकडून पाहणी

Next Post

अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
64
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
12
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
23
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In