• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची वर्ध्यात बैठक; प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची वर्ध्यात बैठक; प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वर्धा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बेरोजगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय धनाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या श्री अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश शिरगरे, ॲड. नंदकिशोर वानखेडे, विनोद वेरूळकर यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

बैठकीत सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शासन स्तरावर या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यात आली.

संघटनेतर्फे नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची बाजू ॲड. लतीश कोठारी यांनी मांडली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांना नोकरी अथवा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत वन व महसूल विभागाला १२ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मुदत उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.

शासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे आता अवमानना याचिका दाखल करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी कलम २८ अंतर्गत असलेल्या तरतुदींवरही सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मोठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील प्रस्ताव भूसंपादन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.

तसेच या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचेही संघटनेच्या राज्याध्यक्षांनी जाहीर केले.

या बैठकीला मनिषा सुरस्कार, निकिता शेंडे, सचिन दहाट, शेखर जामूनकर, दिनेश डेहणे, रवींद्र खंडारे, पांडुरंग मलिये, गजानन बारापात्रे, शेख मोहसीन, शेख कदीर, डॉ. दुर्वास पानसे, सुधाकर डेहणे, राहुल काळे, वाल्मीक पांडे, उमाकांत आडकिने, शैलेश तलवारे, सुधाकर भोंगरे, भिमराव पावडे, संदीप उरकुडे, बंडू आडकिने, सुरज माते, सुनिल काळे, गौतम काळे, सुशिल पाटील, वसंत मंडवे, प्रशांत हेरोडे, देवानंद खंडारे, अतुल डहाके, सचिन तिडके तसेच बोरधरण प्रकल्पग्रस्त संघटनेचे शंकर पानबुडे, ज्ञानेश्वर कोडापे, दिलीप मेश्राम, संजय बोन्द्रे, ज्ञानेश्वर मेश्राम आदी उपस्थित होते.

Tags: Shankar Panbude
Previous Post

अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिकांमध्ये संताप

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
22
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
10
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
46
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
16
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
29
Next Post
वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिकांमध्ये संताप

वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In