• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शेतकरी-शास्त्रज्ञ मंच सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची सभा हिंगणघाट तालुक्यातील भगवा येथे प्रगतिशील शेतकरी बलराज श्योखंड यांच्या शेतावर उत्साहात पार पडली. बदलते हवामान, वाढते तापमान आणि शेतीसमोरील नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पिक विविधता हा शाश्वत पर्याय असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले.

या प्रसंगी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष दिलीप पोहाणे, सदस्य इरफान अली, निलेश नाखले, सिंजेंटा फाउंडेशनचे भूषण गाडेगोणे, डॉ. भारती तिजारे, डॉ. सचिन मुळे तसेच डॉ. अंकिता अंगाईतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

डॉ. जीवन कतोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, झाडांची लागवड केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, कार्बन साठवणूक वाढते आणि हवामान बदलाच्या परिणामांना आळा बसतो. तसेच शेतात मित्र कीटक व पक्ष्यांचा वावर वाढून नैसर्गिक कीड नियंत्रणास मदत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबत वृक्षआधारित शेती आणि पिक विविधतेचा अवलंब करणे आवश्यक आहे.

प्रगतिशील शेतकरी बलराज श्योखंड हे मूळ हरियाणा येथील असून गेल्या दहा वर्षांपासून भगवा येथे शेती करत आहेत. त्यांनी आपल्या शेतात कापूस व सोयाबीनऐवजी बांबू, निलगिरी आणि सरू या झाडांची लागवड करून एक वेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. भविष्यात येथे अॅग्रो टुरिझम विकसित करण्याचाही त्यांचा मानस आहे.

शास्त्रज्ञांनी यावेळी विविध वृक्षांच्या फायद्यांबाबत माहिती दिली. बांबू हा अधिक ऑक्सिजन देणारा आणि कार्बन शोषून घेणारा वृक्ष असून पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त आहे. निलगिरी कमी सुपीक किंवा पाणथळ जमिनीतही चांगली वाढते आणि कागद उद्योगासाठी उपयुक्त ठरते. तर सरूच्या मुळांवरील ‘फ्रँकिया’ जिवाणूमुळे जमिनीतील नत्र वाढून जमिनीचा पोत सुधारतो.

औद्योगिक क्षेत्रात बांबू आणि निलगिरीला वाढती मागणी असल्याने ही शेती आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शास्त्रज्ञांशी थेट संवाद आणि प्रत्यक्ष शेतभेटीमुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजेंद्र मानकर, गणेश वायरे तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर

Next Post

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
51
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
21
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
31
Next Post
प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In