• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांद्याला कवडीमोल भाव; शेतकऱ्यांमध्ये संताप, शासनाकडे अनुदानाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांद्याला कवडीमोल भाव; शेतकऱ्यांमध्ये संताप, शासनाकडे अनुदानाची मागणी
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर : कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावात केवळ ५० पैसे ते ४ रुपये किलोपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

चंद्रकांत गायकवाड यांनी स्वतःचा कांदा विक्रीसाठी सोलापूर मार्केटमध्ये आणला असता त्यांना अत्यंत कमी दर मिळाल्याचा अनुभव आला. त्यांनी तब्बल १८२ पाट्या कांदा बाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यामध्ये पहिल्या दर्जाच्या कांद्याला २ रुपये २५ पैसे प्रतिकिलो, दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला १ रुपया प्रतिकिलो तर तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला केवळ ५० पैसे प्रतिकिलो असा दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा पिकवण्यासाठी किमान ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. मात्र बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

“अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. केंद्र व राज्य शासनाने तातडीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे तसेच कांद्याला हमीभाव देऊन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags: Chandrakant Gaikwad
Previous Post

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल, पुरवठ्यास सुरुवात

Next Post

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत तातडीची बैठक बोलविण्याची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
7
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
4
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
100
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
45
Next Post
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत तातडीची बैठक बोलविण्याची मागणी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत तातडीची बैठक बोलविण्याची मागणी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In