• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत तातडीची बैठक बोलविण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत तातडीची बैठक बोलविण्याची मागणी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

संभाव्य गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; जि. प. सदस्य विराज नाईक यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

शिराळा | प्रतिनिधी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संभाव्य कॉरिडॉर क्षेत्रातील गावांतील प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्तारासंदर्भातील बातम्या विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ९३ गावांऐवजी कॉरिडॉर क्षेत्राचा विस्तार ५५० गावांपर्यंत करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. यात शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रस्तावामुळे संबंधित गावांमध्ये विकासकामांवर निर्बंध येण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेषतः रस्ते बांधणी, वीजपुरवठा, नवीन उद्योग, सिमेंट रस्ते, पक्की बांधकामे तसेच शेतीपूरक व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्याच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

नागरिकांना अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसल्याने संभ्रम वाढत असून, या प्रस्तावात नेमकी कोणती गावे समाविष्ट आहेत, स्थानिकांच्या उपजीविकेवर याचा काय परिणाम होईल, तसेच विकासकामांवर नेमके कोणते निर्बंध येणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, चांदोली वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील तसेच संभाव्य गावांतील प्रमुख नागरिकांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, विश्वासचे संचालक संभाजी पाटील, शिवाजी पाटील, सुहास घोडे-पाटील, तानाजी वनारे, कोंडीबा चौगुले, शंकर मोहिते, पै. शिवाजी लाड, सुरेश चिंचोलकर, बाबासो गोळे, डॉ. तानाजी पाटील, विजय पाटील, वसंतराव भाडुगळे, ॲड. महेश शेडगे, सुनील हाप्पे, युवराज हाप्पे, अमोल कांबळे, राजू खांडेकर आदी उपस्थित होते.

बैठकीत चर्चेसाठी प्रमुख मुद्दे :

  • व्याघ्र कॉरिडॉर प्रस्तावात शिराळा तालुक्यातील नेमकी कोणती गावे समाविष्ट आहेत?
  • प्रस्तावामुळे विकासकामे आणि व्यवसायांवर कोणते निर्बंध येणार?
  • स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार?
  • भविष्यातील उद्योग, व्यवसाय आणि परवानग्यांवर अडचणी निर्माण होणार का?
Previous Post

कांद्याला कवडीमोल भाव; शेतकऱ्यांमध्ये संताप, शासनाकडे अनुदानाची मागणी

Next Post

जिंती विद्यालयाचा ९६.१५ टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
7
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
4
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
100
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
45
Next Post
जिंती विद्यालयाचा ९६.१५ टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जिंती विद्यालयाचा ९६.१५ टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In