• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्णत्वास – नितीन गडकरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्णत्वास – नितीन गडकरी
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

जेजुरी येथे उड्डाणपूल उभारणार; फलटणच्या रस्त्यांसाठी ९७ कोटींची तरतूद

सुरवडी | प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग (NH-965) प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पाचे तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. फलटण तालुक्यातील सुरवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

यावेळी गडकरी यांनी सांगितले की, दिवे घाटातील अरुंद रस्त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकीची समस्या आता दूर झाली असून घाटातील रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जेजुरी येथील बायपासला स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाची दखल घेत त्या ठिकाणी ‘फ्लाय ओव्हर’ अर्थात उड्डाणपूल उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच फलटण तालुक्यातील विविध रस्ते विकास कामांसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार ९७ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पालखी महामार्ग हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श ठरेल, असे सांगताना गडकरी म्हणाले की, या मार्गावर ४६ तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ४० हजार नवीन झाडांची लागवड करण्यात आली असून ४५० जुन्या झाडांचे यशस्वी पुनरोपण करण्यात आले आहे.

वाढते प्रदूषण लक्षात घेता हा महामार्ग ‘ग्रीन हायवे’ म्हणून विकसित करण्यासाठी स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी झाडांचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“पालखी मार्गामुळे पर्यटन वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेस Dhairyasheel Mohite Patil, Sachin Patil, Abhijit Patil, नगराध्यक्ष समशेर दादा निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: Nikesh Bhise
Previous Post

जिंती विद्यालयाचा ९६.१५ टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

आजरा शहराचा वीज प्रश्न सुटणार; १५ दिवसांत पर्यायी वीज लाईन कार्यान्वित करण्याचे महावितरणचे आश्वासन

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
170
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
आजरा शहराचा वीज प्रश्न सुटणार; १५ दिवसांत पर्यायी वीज लाईन कार्यान्वित करण्याचे महावितरणचे आश्वासन

आजरा शहराचा वीज प्रश्न सुटणार; १५ दिवसांत पर्यायी वीज लाईन कार्यान्वित करण्याचे महावितरणचे आश्वासन

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In