• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा शहराचा वीज प्रश्न सुटणार; १५ दिवसांत पर्यायी वीज लाईन कार्यान्वित करण्याचे महावितरणचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा शहराचा वीज प्रश्न सुटणार; १५ दिवसांत पर्यायी वीज लाईन कार्यान्वित करण्याचे महावितरणचे आश्वासन
0
SHARES
442
VIEWS
Ad 1

अन्याय निवारण समिती व नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा; ठोस पावले न उचलल्यास जनआंदोलनाचा इशारा

आजरा | प्रतिनिधी

आजरा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत. “पुढील १५ दिवसांच्या आत पर्यायी दुसऱ्या विद्युत लाईनची व्यवस्था करण्यात येईल,” असे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. अन्याय निवारण समिती, स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

सलग दोन रात्री शहर अंधारात

दिनांक १२ आणि १३ मे २०२६ रोजी सलग दोन रात्री आजरा शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी वीज नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी पुढाकार घेत १४ मे रोजी सकाळी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.

अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब

बैठकीत नगरसेवक बाळ केसरकर आणि किरण कांबळे यांनी प्रशासकीय दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुडेखान यांनी “रात्रभर वीज नसल्यास वयोवृद्ध नागरिकांनी कसे जगायचे?” असा प्रश्न उपस्थित केला. तर प्रकाश सावंत यांनी “तालुका बिल वसुलीत प्रथम क्रमांकावर असताना केवळ आजरा शहराचीच वीज वारंवार का जाते?” असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

१२ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न ऐरणीवर

चर्चेदरम्यान मलिग्रे येथे १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले पर्यायी सबस्टेशन अद्याप तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याची माहिती समोर आली. नगरसेवक परशुराम बामणे यांनी इशारा देत सांगितले की, “येत्या १५ दिवसांत पर्यायी वीजपुरवठा सुरू झाला नाही तर हजारो नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

महावितरणचे आश्वासन

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (प्रभारी) नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता कृष्णात कोळी आणि वायरमन संतोष डोंगरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मलिग्रे सबस्टेशनची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, तसेच वीजवाहिन्यांवरील झाडांची छाटणी करून १५ दिवसांत पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

बैठकीस उपस्थित मान्यवर

या बैठकीस नगरसेवक सोनेखान, गौरव देशपांडे (उपाध्यक्ष, अन्याय निवारण समिती), जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोझा, अतुल पाटील, दिनकर जाधव, शरीफ खेडेकर, मुनीर माणगावकर, सफवान काकतीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्णत्वास – नितीन गडकरी

Next Post

माळशिरस तालुक्याच्या दुष्काळमुक्तीसाठी ११ हजार सह्यांची मोहीम

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
52
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
31
Next Post
माळशिरस तालुक्याच्या दुष्काळमुक्तीसाठी ११ हजार सह्यांची मोहीम

माळशिरस तालुक्याच्या दुष्काळमुक्तीसाठी ११ हजार सह्यांची मोहीम

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In