• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवाशक्तीला दिशा देण्यासाठी २१ मे रोजी श्रीखेड येथे कार्यकर्त्यांची विशेष बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

शहादा, दि.१३ (प्रतिनिधी)
राजकीय हव्यासापोटी दिशाहीन होत चाललेल्या युवाशक्तीला सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच श्रमिक, कष्टकरी आणि आदिवासी चळवळीची पुढील दिशा ठरवण्यासाठी दिनांक २१ मे २०२६ रोजी श्रीखेड (ता. शहादा) येथे विशेष कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लोककवी वाहरू सोनवणे हे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित कार्यकर्त्यांसाठी ही बैठक वैचारिक पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

आयुष्याची अनेक वर्षे सामाजिक चळवळीत व्यतीत केलेल्या वाहरू सोनवणे यांचा अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या बैठकीतून होणार आहे. युवाशक्ती ही केवळ राजकीय साधन न राहता सामाजिक परिवर्तनाची निर्णायक शक्ती म्हणून उभी राहावी, हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीदरम्यान विद्रोही विचार आणि जनसामान्यांच्या वेदना मांडणाऱ्या कविता व गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. अन्यायाविरोधात शब्दांच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या कलावंतांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

ही बैठक २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीखेड येथे पार पडणार असून, बैठकीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजकांना भ्रमणध्वनीद्वारे आपली उपस्थिती पूर्वकल्पित कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“रात्र आपली आहे; पण येणाऱ्या काळ्या रात्रींना थोपवण्यासाठी दिशादर्शक दीपस्तंभाची गरज आहे,” या विचाराने प्रेरित होऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्रोही साहित्यिक दादाभाई पिंपळे यांनी केले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा-मंदाणे रस्त्यावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Next Post

नाशिक-शहादा एसटी बसला उमराणे शिवारात भीषण अपघात; ८ प्रवासी जखमी

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

नाशिक-शहादा एसटी बसला उमराणे शिवारात भीषण अपघात; ८ प्रवासी जखमी

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In