• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिक-शहादा एसटी बसला उमराणे शिवारात भीषण अपघात; ८ प्रवासी जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

शहादा, दि.१३ (प्रतिनिधी)
नाशिकहून शहाद्याकडे येणाऱ्या शहादा आगाराच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने अथवा तांत्रिक बिघाडामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडाला धडकून पलटी झाली. या अपघातात चालकासह आठ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची एमएच १४ एमएस २३१० क्रमांकाची बस नाशिकहून प्रवाशांना घेऊन शहाद्याकडे येत होती. सकाळच्या सुमारास बस उमराणे गावाजवळ पोहोचली असता अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर बसने रस्त्यालगतच्या मोठ्या झाडाला जोरदार धडक दिली आणि बस पलटी झाली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून उमराणे गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. बसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या आठ प्रवासी आणि चालकाला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली.

हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा आगारातून बस सुटल्यानंतर काही अंतरावरच तांत्रिक बिघाड अथवा अपघाताच्या घटना घडत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया :
“मृत्यू समोर उभा होता, पण काळाने यू-टर्न घेतला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. मात्र, प्रत्येक आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यापूर्वी त्यांची तांत्रिक तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. आगार प्रमुख आणि तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” असे शहादा तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी म्हटले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

युवाशक्तीला दिशा देण्यासाठी २१ मे रोजी श्रीखेड येथे कार्यकर्त्यांची विशेष बैठक

Next Post

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ उत्साहात साजरा

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ उत्साहात साजरा

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In