• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ; अव्वाच्या सव्वा भाडे घेऊनही सुविधा शून्य, आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ; अव्वाच्या सव्वा भाडे घेऊनही सुविधा शून्य, आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

शहादा, दि.१४ (प्रतिनिधी)

शहादा शहरातून पुणे व मुंबईकडे धावणाऱ्या खासगी लक्झरी बस चालक-मालकांकडून सध्या प्रवाशांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हजारो रुपये भाडे आकारूनही या बसमध्ये मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि महिला प्रवाशांसाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. महागडे भाडे देऊनही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

RelatedPosts

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

विशेषतः रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लक्झरी बसमध्ये चालकाच्या कॅबिनमध्येच क्षमतेपेक्षा अधिक आणि बेकायदेशीर प्रवासी बसवले जातात. त्यामुळे बसमधील मार्ग अरुंद होऊन महिलांना चालकापर्यंत पोहोचणे जिकिरीचे ठरते. नैसर्गिक विधीसाठी गाडी थांबवण्याची विनंती केल्यावर चालकांकडून उर्मट भाषेत उत्तर दिले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. “मागे हॉटेलवर गाडी थांबली होती तेव्हा काय करत होतात?” अशा शब्दांत महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. संकोचामुळे अनेक महिलांना त्रास सहन करतच प्रवास करावा लागत आहे.

अनेक खासगी लक्झरी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या, सीट खिळखिळे, लाईट व चार्जिंग पॉईंट बंद अशा स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एसी बसचे तीन ते चार पट भाडे आकारूनही थंडावा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही बसमधील क्लिनर मद्यप्राशन करून प्रवाशांशी हुज्जत घालत असल्याचेही समोर आले आहे. या तक्रारी मालकांकडे केल्यास फोन न उचलणे किंवा उलट प्रवाशांनाच दमदाटी केल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रवाशांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, “आरटीओ आमचे काहीही करू शकत नाही,” अशी भाषा काही बस चालक वापरत आहेत. शहादा ते पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या बसची प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्त्यात तपासणी होत नसल्याने वाहनांचे फिटनेस, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही, जीपीएस व विम्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच हे प्रकार सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून या बसेसची तातडीने तपासणी करावी, वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आरटीओ विभागाने प्रत्येक गाडीचे चालक व क्लिनर यांची रस्त्यात तपासणी केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येतील, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ उत्साहात साजरा

Next Post

न्यू पिंपळोली हायस्कूलमध्ये मुलींचा दबदबा; मासले बेलपाडा गावाच्या विद्यार्थिनी अव्वल

Related Posts

ताज्या घडामोडी

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026
13
ताज्या घडामोडी

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

July 2, 2026
3
ताज्या घडामोडी

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

July 2, 2026
13
ताज्या घडामोडी

काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

July 2, 2026
21
ताज्या घडामोडी

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे टेंभीखोडावे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ

July 2, 2026
47
चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप
ताज्या घडामोडी

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

July 2, 2026
20
Next Post
न्यू पिंपळोली हायस्कूलमध्ये मुलींचा दबदबा; मासले बेलपाडा गावाच्या विद्यार्थिनी अव्वल

न्यू पिंपळोली हायस्कूलमध्ये मुलींचा दबदबा; मासले बेलपाडा गावाच्या विद्यार्थिनी अव्वल

ताज्या बातम्या

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

July 2, 2026

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In