• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पणदूर येथील ‘सविता आश्रम’ वादाच्या भोवऱ्यात; अनाथ महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
183
VIEWS
Ad 1

पणदूर (प्रतिनिधी):

कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील ‘सविता आश्रम’ सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. आश्रमातील एका अनाथ महिलेला कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप समोर आला असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमातील एक महिला रस्त्यावर आली असता काही कर्मचाऱ्यांनी तिला जबरदस्तीने ओढत नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी संबंधित महिलेला मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

दरम्यान, संबंधित महिलेने “आश्रमात आम्हाला मारहाण केली जाते. भीतीपोटी मी आश्रमातून बाहेर पडले,” असा गंभीर आरोप केल्याचे सांगितले जात आहे. या वक्तव्यानंतर आश्रमातील इतर अनाथ व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आश्रमातील काही व्यक्ती अनेकदा लोकवस्तीमध्ये भटकताना दिसतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आश्रमाच्या कामकाजाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आश्रमाचे संचालक संदीप परब यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नसल्याचे समोर आले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून आश्रमातील वास्तव परिस्थिती समोर आणावी, तसेच अनाथ व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Umesh Sail
Previous Post

मुरबाड तहसील कार्यालय तळीरामांचा अड्डा? कार्यालय परिसरात विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ

Next Post

पुसेगावात १६ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; ३०० युवक-युवतींना रोजगाराची संधी

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
65
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
12
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
23
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post

पुसेगावात १६ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; ३०० युवक-युवतींना रोजगाराची संधी

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In