• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि उत्पादन घट यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी पिक विमा योजना यंदा मात्र यवतमाळ जिल्ह्याला लागू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. किसनरावजी वानखेडे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

यापूर्वी त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची सविस्तर माहिती दिली होती. यवतमाळ हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील बहुतांश शेतकरी सोयाबीन, कापूस आणि खरीप पिकांवर अवलंबून आहेत. हवामानातील बदल, अतिवृष्टी, पावसाचा खंड तसेच कीडग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

त्यानंतर आज मुंबई येथे राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांची आमदार किसनरावजी वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी यवतमाळ जिल्ह्याला पिक विमा मदतीच्या यादीत समाविष्ट करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाच्या मदतीची त्यांना नितांत गरज असल्याचे आमदार वानखेडे यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेक गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिक विमा योजनेचा मूळ उद्देश संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे हा आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी पिक विमा संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून यवतमाळ जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले.

“माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका आमदार किसनरावजी वानखेडे यांनी मांडत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे आशेने पाहत असून, पिक विमा मदत जाहीर झाल्यास हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tags: Ram Hamad
Previous Post

शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड

Next Post

वाघोली येथे विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

वाघोली येथे विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In