• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
87
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : शुभारंभ फाउंडेशन, कुरुंदवाड या सेवाभावी संस्थेतर्फे इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वही, पेन आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाडचे नगरसेवक मा. जय ऊर्फ बाबासो कडाळे हे होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव दरिकांत कोळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शुभारंभ फाउंडेशनचे ब्रीदवाक्य ‘आधार माणुसकीचा’ असे असून, समाजातील सर्वसामान्य व्यक्तींना आधार देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.”

मनोगतात श्री. उत्तम भोई म्हणाले की, ही संस्था सामान्य जनतेची असून समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत आहे. नगरसेवक जय ऊर्फ बाबासो कडाळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, “संस्थेला आणि नागरिकांना लागणारी मदत आम्ही निश्चित करू,” असे आश्वासन दिले. तसेच संस्थेच्या संचालकपदी निवड झालेल्या सौ. खरोसे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एस.पी. हायस्कूल, कुरुंदवाड येथील कु. श्रुती दत्तात्रय कुरुंदवाडे हिने ९८.६० टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच घोरपडे आदिती विजय हिने ९७.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कुलकर्णी प्रथमेश जितेंद्र यांनी ९४.८० टक्के गुण प्राप्त केले.

माध्यमिक आश्रमशाळा, तेरवाड येथील प्रतीक प्रकाश लोटपाल (७८.८०%), इम्रान रमजान केरूरे (७१.८०%) आणि कु. बेफारी तनाज अशपाक (७०.६०%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड येथील कु. सिद्धी सारंग चव्हाण हिने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. कु. श्रावणी महावीर मगदूम हिने ९४.८० टक्के, तर कु. प्रांजली प्रमोद कांबळे हिने ९०.४० टक्के गुण मिळवले. आलमा इकबाल उर्दू हायस्कूलमधील आफिया झाकीर बाणदार हिने ८३.४० टक्के गुण संपादन केले.

एकूण चार हायस्कूलमधील १२ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दरिकांत कोळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास माळी यांनी मानले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पूर्वा मेश्राम हिला सुवर्णपदक

Next Post

विवाह सोहळ्यात हरिपाठ वाटपाचा अनोखा उपक्रम; औंधे-हडदरे कुटुंबाचा संस्कार जपणारा आदर्श

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
167
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
विवाह सोहळ्यात हरिपाठ वाटपाचा अनोखा उपक्रम; औंधे-हडदरे कुटुंबाचा संस्कार जपणारा आदर्श

विवाह सोहळ्यात हरिपाठ वाटपाचा अनोखा उपक्रम; औंधे-हडदरे कुटुंबाचा संस्कार जपणारा आदर्श

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In