• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना निवेदन
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

पुणे प्रतिनिधी

शिरूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर यांच्या वतीने आज दि. १४ मे २०२६ रोजी शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना शिरूर शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवेदनात नमूद करण्यात आले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून अतुलनीय बलिदान दिले. त्यांचे शौर्य, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती ही समाजासाठी प्रेरणादायी असून पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शिरूर शहरात भव्य स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे.

शिरूर तालुक्यातील वढू-तुळापूर या ऐतिहासिक स्थळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अंतिम संस्कार झाल्यामुळे शिरूर तालुक्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आजपर्यंत शिरूर शहरात त्यांच्या सन्मानार्थ कोणतेही भव्य स्मारक उभारण्यात आले नसल्याची खंत शिवप्रेमींनी व्यक्त केली.

धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेले बलिदान हे आजही समाजासाठी चिरंतन प्रेरणास्थान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील योग्य व मध्यवर्ती जागेची पाहणी करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य, प्रेरणादायी आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असे स्मारक उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

या स्मारकामुळे शिरूर शहराच्या ऐतिहासिक वारशाला अधिक बळ मिळून पर्यटन व सांस्कृतिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी निवेदन स्वीकारून या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक सुनील जाधव, संतोष थेऊरकर, सागर नरवडे, निलेश गाडेकर, निलेश पवार तसेच नगरसेविका रिंकू जगताप, सुनीता कुरुंदळे, स्वीटी शिंदे, सुनीता भुजबळ, आयेशा सय्यद, स्वाती साठे व संगीता मल्लाव उपस्थित होते.

तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कृणाल काळे, सुनील इंदुलकर, सागर परभणे व विकास सांबारे यांच्यासह पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार नाशिकला “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान

Next Post

जळकोट येथे अन्नत्याग आंदोलन; बस आगारासह विविध मागण्यांसाठी तालुका विकास परिषदेचा एल्गार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

जळकोट येथे अन्नत्याग आंदोलन; बस आगारासह विविध मागण्यांसाठी तालुका विकास परिषदेचा एल्गार

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In