• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शी पोलिसांची दमदार कारवाई; २ लाख ३९ हजारांचे ११ मोबाईल हस्तगत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
चामोर्शी पोलिसांची दमदार कारवाई; २ लाख ३९ हजारांचे ११ मोबाईल हस्तगत
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

चामोर्शी | दि. १५ मे

गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाईल प्रकरणांवर प्रभावी कारवाई करत चामोर्शी पोलिसांनी तब्बल २ लाख ३९ हजार रुपये किमतीचे ११ अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक तपास आणि CEIR पोर्टलच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

मागील काही महिन्यांपासून चामोर्शी परिसरातून हरविलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तांत्रिक कौशल्याचा वापर करून संबंधित मोबाईलचा मागोवा घेत पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले.

पोलीस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षणासाठी आलेले गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे उपस्थित होते.

ही कारवाई चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार मनीषा चिताडे आणि पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

मोबाईल चोरी व गहाळ प्रकरणांमध्ये तांत्रिक तपासाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देणारी ही कारवाई ठरली असून, चामोर्शी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस दलासाठी ही कामगिरी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

व्हेंटिलेटर बंद पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू? महिला व बाल रुग्णालयातील गंभीर हलगर्जीपणाचा आरोप

Next Post

ग्रामपंचायत प्रशासनाचा बोजवारा; सरपंचांचा कार्यकाळ संपला तरी प्रशासक नेमणूक नाही!

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
2
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
7
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
13
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post

ग्रामपंचायत प्रशासनाचा बोजवारा; सरपंचांचा कार्यकाळ संपला तरी प्रशासक नेमणूक नाही!

ताज्या बातम्या

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In