• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रावणगाव येथे ‘गट शेती’ प्रशिक्षण उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
रावणगाव येथे ‘गट शेती’ प्रशिक्षण उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह
0
SHARES
120
VIEWS
Ad 1

दौंड | प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा टीम दौंड आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रावणगाव (ता. दौंड) येथे आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय ‘गट शेती’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. तालुका कृषी अधिकारी श्री. अजिंक्य दुधाने यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

या प्रशिक्षण शिबिरामध्ये शेतकऱ्यांना गट शेतीचे महत्त्व, त्याचे फायदे, व्यवस्थापन आणि भविष्यातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “गट शेती ही काळाची गरज आहे” हा संदेश प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कार्यक्रमात पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. सुखदेव तात्या भोसले, मास्टर ट्रेनर ॲड. रवींद्र पोमणे, तालुका समन्वयक श्री. मयुर साळुंके आणि गुंजन निकम मॅडम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कमी खर्चात अधिक उत्पादन, सामूहिक नियोजन आणि आधुनिक शेती पद्धती याविषयी माहिती देताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली.

महिला व पुरुष शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या प्रशिक्षणाचे विशेष आकर्षण म्हणजे महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. दूरवरच्या भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी गट शेतीबाबत उत्सुकता दाखवत या उपक्रमाचे स्वागत केले. प्रशिक्षणानंतर अनेक शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास रावणगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. निर्मला ताई आटोळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनकर आटोळे, प्रगतशील शेतकरी श्री. लक्ष्मण तात्या रांधवण आणि परिवहन अधिकारी श्री. दत्तात्रय गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यशस्वी आयोजनासाठी परिश्रम

हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड, आत्मा टीम आणि पाणी फाऊंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रकाश लोणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अंगद शिंदे यांनी मानले.

गट शेती चळवळीला मिळणार गती

रावणगाव येथे झालेल्या या प्रशिक्षणामुळे दौंड तालुक्यात गट शेती चळवळीला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे. सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Bapu Nawle
Previous Post

ग्रामपंचायत प्रशासनाचा बोजवारा; सरपंचांचा कार्यकाळ संपला तरी प्रशासक नेमणूक नाही!

Next Post

दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
59
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
33
Next Post
दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा

दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In