• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

दौंड: (प्रतिनिधी)

दौंड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचे गुरुवारी (दि. १४ मे २०२६) निधन झाले. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, एका कर्तृत्ववान नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

उषादेवी जगदाळे या दौंड गावचे पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय कृष्णराव जगदाळे पाटील यांच्या पत्नी होत. विवाहानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यासाठी वाहून घेतले. त्यांनी १९७२ ते १९७७ आणि १९८५ ते १९९० या कालावधीत दौंड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत पहिल्या महिला आमदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले.

त्या दौंड नगरपरिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष देखील होत्या. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम केले. तसेच विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्या त्या सहकारी होत्या.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः पुणे-दौंड रेल्वे शटल सेवा सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘दौंड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम करत खोर (ता. दौंड) येथे सरस्वती शिक्षण संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

त्यांचा सामाजिक व राजकीय वारसा त्यांचे पुत्र पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे आणि दौंडच्या विद्यमान नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे पुढे नेत आहेत.

उषादेवी जगदाळे यांच्या निधनामुळे दौंड तालुक्याने एक खंबीर, दूरदृष्टी असलेले आणि जनसामान्यांशी नाळ जपणारे नेतृत्व गमावले असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Tags: Bapu Nawle
Previous Post

रावणगाव येथे ‘गट शेती’ प्रशिक्षण उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह

Next Post

सिग्नलवर काही क्षणांचा थांबा आता सावलीसोबत; त्रिमूर्ती चौकात अभिनव उपक्रम

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
58
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
33
Next Post
सिग्नलवर काही क्षणांचा थांबा आता सावलीसोबत; त्रिमूर्ती चौकात अभिनव उपक्रम

सिग्नलवर काही क्षणांचा थांबा आता सावलीसोबत; त्रिमूर्ती चौकात अभिनव उपक्रम

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In