• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोवंशाची तस्करी करणारा कंटेनर ग्रामस्थांनी पकडला; ४० जनावरांची सुटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

पांढरकवडा वार्ता :
दि. १५/०५/२०२६

यवतमाळ-जोडमोहा-मोहदा मार्गावर गोवंशाची तस्करी करणारा कंटेनर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला. या कारवाईत सुमारे ४० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

मिळालेल्या माहितीनुसार, HR55 T 4295 क्रमांकाचा कंटेनर यवतमाळहून जोडमोहा मार्गे तेलंगणाच्या दिशेने जात होता. यावेळी जोडमोहा परिसरात ट्रॅक्टर आणि बैलबंडीला अल्पशी धडक देत कंटेनर भरधाव वेगाने पांढरकवड्याकडे निघाला.

घटनेनंतर जोडमोहा येथील युवकांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. मोहदा येथे ग्रामस्थांच्या मदतीने कंटेनर अडवण्यात आला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये बैल, गायी आणि वासरे अशा सुमारे ४० गोवंशीय जनावरांची अमानुषरीत्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने सर्व जनावरांची सुटका करून त्यांना पांढरकवडा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. तसेच कंटेनरमधील चालकासह इतर आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात ग्रामस्थांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

Previous Post

कार्यालयात पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद इंधन बचतीचा नवा पायंडा

Next Post

लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत ९५१ जणांवर उपचार

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
2
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
8
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
15
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
49
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
26
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
9
Next Post

लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत ९५१ जणांवर उपचार

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In