• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत ९५१ जणांवर उपचार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी

मे महिना मध्यावर आला असून नागरिकांना आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. मात्र यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे लातूर जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णताजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९५१ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. प्रखर उन्हामुळे सनबर्न, हिट क्रॅम्प्स, हिट एग्झॉर्शन आणि उष्माघातासारख्या विकारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यात आले. एप्रिल महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ आरोग्य संस्थांमध्ये ३९५ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर १ मार्च ते १ मे या कालावधीत जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू करण्यात आलेल्या उष्माघात कक्षांमध्ये ५५६ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उष्णतेमुळे थकवा, ताप, त्वचेवर पुरळ येणे, हातापायांना गोळे येणे, त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे आणि नाडीचे ठोके वेगाने होणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना याचा अधिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने मार्च महिन्यापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून औषधसाठा उपलब्ध करून देणे, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Previous Post

गोवंशाची तस्करी करणारा कंटेनर ग्रामस्थांनी पकडला; ४० जनावरांची सुटका

Next Post

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In