• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख ३६ हजार मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

बीएलओ करणार घरोघरी भेटी

या मोहिमेसाठी लातूर जिल्ह्यातील २ हजार १४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपशीलांची खातरजमा करतील. प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (बीएलए) देखील सहकार्य करणार आहेत.

जनगणना आणि पुनरिक्षणाची सांगड

सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा विचार करून विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून २०२६ पासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.

लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे वेळापत्रक

  • २० ते २९ जून २०२६ : बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी
  • ३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी भेटी व माहिती संकलन
  • ५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
  • ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारणे
  • ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

राजकीय पक्षांना आयोगाचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे दुबार नावे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि नव्या पात्र मतदारांची नोंदणी अधिक अचूक व पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार संख्या

  • लातूर ग्रामीण – ३,३२,०११
  • लातूर शहर – ३,९९,१०५
  • अहमदपूर – ३,४५,३६०
  • उदगीर (अ.जा.) – ३,२३,५६५
  • निलंगा – ३,३३,३९१
  • औसा – ३,०३,२०९

या विशेष मोहिमेमुळे मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: Vilas Patil
Previous Post

लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत ९५१ जणांवर उपचार

Next Post

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार – दयानंद सुरवसे

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार – दयानंद सुरवसे

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In