• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संजय गांधी निराधार योजना समिती गठीत; रेणापूरच्या अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूरच्या अध्यक्षपदी बन्सी भिसे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

लातूर | दि. १४ प्रतिनिधी

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रेणापूर व लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची नव्याने गठण करण्यात आली आहे. भाजपा नेते तथा आमदार रमेशआप्पा कराड यांच्या शिफारशीनुसार या समित्यांची स्थापना करण्यात आली असून रेणापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी सतीश आंबेकर यांची, तर लातूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी १३ मे २०२६ रोजी नियुक्तीपत्र जारी केले. त्यानुसार दोन्ही तालुक्यांतील अध्यक्ष व सदस्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.

रेणापूर तालुका समिती

रेणापूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी सतीश रावसाहेब आंबेकर (नरवटवाडी) यांची निवड करण्यात आली आहे. समिती सदस्य म्हणून ललिता अरुण कांबळे (पानगाव), कस्तुराबाई आत्माराम माने (चाडगाव), विठ्ठल काशीनाथ कसपटे (निवाडा), संजय लक्ष्मण चव्हाण (रेणापूर), गोविंदराव नानासाहेब देशमुख (डी. देशमुख), सदानंद केदारनाथ पिंपळे (खरोळा), विरेंद्रसिंह गोविंदसिंह चौहान (पानगाव), सतीश उद्धवराव जाधव (बिटरगाव) आणि सुरेश रामराव बुड्डे (आनंदवाडी) यांचा समावेश करण्यात आला आहे.

लातूर तालुका समिती

लातूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी बन्सी भगवानराव भिसे (सारसा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून परमेश्वर माधवराव पर्वते (शिवणी), स्वाती किशोर घुटे (एकुरगा), संतोष नारायण गायकवाड (सलगरा बु.), अंकुश हरिभाऊ कुंभार (मुरुड), विनायक मल्हारी मगर (रामेगाव), सदाम रशीद शेख (मुरुड), सदाशिव सोपान गव्हाने (सलगरा), रुपेश सूर्यकांत काळे (भातखेडा) आणि बाबासाहेब साहेबराव भिसे (गाधवड) यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांचे विविध राजकीय, सामाजिक आणि शासकीय स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, निराधार नागरिकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समित्या सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Vilas Patil
Previous Post

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार – दयानंद सुरवसे

Next Post

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी सज्ज राहा : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी सज्ज राहा : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In