• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी सज्ज राहा : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

बियाणे व खत वितरणात सुसूत्रता ठेवण्याच्या सूचना

लातूर | दि. १४ प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा संभाव्य परिणाम होण्याचा अंदाज वर्तविल्याने आगामी खरीप हंगामासाठी प्रशासनाने आवश्यक सज्जता ठेवावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे आणि खत वापराबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. यावेळी विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन, वन, आत्मा आणि अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भोसले म्हणाले की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात खत व बियाणे उपलब्ध ठेवून कोणत्याही तालुक्यात तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाबीज बियाणे वितरणाबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘एल-निनो’मुळे मान्सून अनिश्चित राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना योग्य पेरणी कालावधीबाबत सातत्याने मार्गदर्शन करावे. संभाव्य दुबार पेरणीची वेळ आल्यास पुरेशा बियाण्यांचा साठा उपलब्ध राहील, यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर, पर्यायी पीक पद्धती आणि योग्य वाण निवडीबाबत कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्ह्यात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनावरही भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. यंदा जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ३ लाख ६४ हजार २४८ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २ लाख ३६ हजार ७६१ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून उर्वरित बियाणे महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी सुमारे १ लाख ४५ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज भासेल, असा अंदाज असून त्यानुसार महिनानिहाय पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बोगस बियाणे व खत विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत आमदार विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि आमदार रमेश कराड यांनीही विविध सूचना मांडल्या.

Tags: Vilas Patil
Previous Post

संजय गांधी निराधार योजना समिती गठीत; रेणापूरच्या अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूरच्या अध्यक्षपदी बन्सी भिसे

Next Post

नालेसफाईतून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्या : स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
नालेसफाईतून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्या : स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले

नालेसफाईतून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्या : स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In