• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नालेसफाईतून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्या : स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
नालेसफाईतून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्या : स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

मान्सूनपूर्व नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रशासनाला निर्देश

लातूर | प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व नालेसफाई कामांना गती देत पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरातील कोणत्याही भागात पाणी साचू नये किंवा नाल्या तुंबू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

महानगरपालिकेकडून शहरात नालेसफाईची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, या कामांची प्रत्यक्ष पाहणी स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी केली. माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली. यावेळी गटनेते विजयकुमार साबदे, उपायुक्त वसुधा फड, स्वच्छता विभागाचे अधिकारी रमाकांत पिडगे, कलीम शेख आदी उपस्थित होते.

दरवर्षी १ मेपासून सुरू होणारी नालेसफाई मोहीम यंदा मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन एक महिना आधीच सुरू करण्यात आली आहे. शहरातील चारही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चार लहान व दोन मोठ्या जेसीबी, एक पोकलेन आणि सहा हायवा यांच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे.

गतवर्षीच्या पावसात शहरातील अनेक भागांत नाल्या तुंबून अस्वच्छता आणि पाणी साचण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. यंदा अशा समस्या टाळण्यासाठी नालेसफाई प्रभावीपणे करण्याच्या सूचना सभापती बंडापल्ले यांनी दिल्या. विशेषतः रिंग रोड, पाच नंबर चौक आणि समांतर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने त्या भागात कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था उभारण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

शहरातील प्रत्येक गल्ली-बोळातील नाल्यांची नियमित साफसफाई करून कचरा अडकणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांचाही विचार करून नालेसफाईच्या कामात कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपायुक्त वसुधा फड यांनी शहरातील नालेसफाईचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. सभापतींनी केलेल्या सूचनांनुसार उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील काही भागात नाल्यांवरील पुलांवर पाणी साचून वाहनधारकांचे अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले आणि मनपा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. ज्या ठिकाणी नाल्या तुंबून पुलांवर पाणी येते, त्या ठिकाणच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Tags: Vilas Patil
Previous Post

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी सज्ज राहा : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Next Post

मुरुड येथे महिनाभरात अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार : आ. रमेशआप्पा कराड

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
मुरुड येथे महिनाभरात अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार : आ. रमेशआप्पा कराड

मुरुड येथे महिनाभरात अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार : आ. रमेशआप्पा कराड

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In