• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुरुड येथे महिनाभरात अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार : आ. रमेशआप्पा कराड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुरुड येथे महिनाभरात अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार : आ. रमेशआप्पा कराड
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

महाराजस्व समाधान शिबिरात घोषणा

सहा महिन्यांत नगरपरिषद प्रश्नही मार्गी लागणार

लातूर | दि. १५ प्रतिनिधी

मुरुडसारख्या मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावात अनेक वर्षांपूर्वीच नगर परिषद आणि तहसील कार्यालय सुरू होणे अपेक्षित होते. शासनस्तरावरील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या महिनाभरात मुरुड येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद स्थापनेबाबतचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून पुढील सहा महिन्यांत नगरपरिषदेचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लातूर तालुक्यातील मुरुड येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी सतीश चोरमले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, संगायो समिती अध्यक्ष बन्सी भिसे, पंचायत समिती सदस्या पंकज गायकवाड, सुचिता अंधारे तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. कराड म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. “जनतेचे समाधान होईपर्यंत हे शिबिर सुरू राहणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध भागांमध्ये आयोजित समाधान शिबिरांतून शेकडो नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ते पोहोचवले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

घरकुल योजनांपासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत, “स्वतःचे कबाले नसल्याने अनेकांना योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाने कबाले देण्याचा निर्णय घेतला असून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही,” असे आ. कराड यांनी सांगितले.

मुरुड येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत पुढील आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याची सूचना केली.

यावेळी समाधान शिबिरात विविध योजनांअंतर्गत लाभांचे वितरण करण्यात आले. लखपती दीदी प्रमाणपत्र, लेक लाडकी योजनेचा हप्ता, बेबी केअर किट, शेळी गट वाटप, गाव नकाशे, संगायो योजनेची मंजुरीपत्रे, डिजिटल शिधापत्रिका, आयुष्यमान भारत कार्ड, रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्रे, जिवंत सातबारा तसेच स्वयंसहायता समूहांना धनादेश वितरण करण्यात आले. काही लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचेही वाटप करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार गणेश सरवदे यांनी केले तर आभार महेश कणसे यांनी मानले. समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Tags: Vilas Patil
Previous Post

नालेसफाईतून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्या : स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले

Next Post

२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न अखेर निकाली

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न अखेर निकाली

२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न अखेर निकाली

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In