• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परवान्याचा गैरवापर; जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

वैध मापन शास्त्र विभागाची कारवाई

| चामोर्शी | दि. १५

इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी या संस्थेवर वैध मापन शास्त्र विभागाने कठोर कारवाई करत त्यांचा विक्री परवाना निलंबित केला आहे. अधिकार नसताना लहान दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन करून देण्याच्या नावाखाली रक्कम घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार जनबंधू स्केल सर्व्हिसेस चे प्रोप्रायटर अमोल नोमेश्वर जनबंधू यांचा विक्री परवाना क्रमांक LM/GDL/LD/018 हा दिनांक २९ एप्रिल २०२६ पासून निलंबित करण्यात आला आहे.

तपासादरम्यान संबंधित परवानाधारकाने वैध मापन शास्त्र अधिनियम व परवान्याच्या अटींचा भंग केल्याचे आढळून आले. विभागाच्या माहितीनुसार, संबंधित संस्थेला केवळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या विक्रीचा परवाना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी अधिकृत अधिकार नसताना विविध किरकोळ दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी, मुद्रांकन व प्रमाणिकरण करून देण्याचे सांगत त्याबदल्यात रक्कम स्वीकारल्याचे समोर आले.

वजन काट्यांचे अधिकृत पडताळणी व मुद्रांकन करण्याचा अधिकार केवळ वैध मापन शास्त्र विभागाकडे असताना अशा प्रकारे नागरिकांची व व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक आर. एन. फुलझेले यांनी नागरिक, व्यापारी व ग्राहकांनी वजन-माप पडताळणी अथवा मुद्रांकन प्रक्रिया अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न अखेर निकाली

Next Post

वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे नुकसान

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
91
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे नुकसान

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In