• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in क्राईम
0
लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

शिरूर अनंतपाळ (विशेष प्रतिनिधी):

लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, जुगार आणि सट्टेबाजीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंर्तगत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड येथे एका हॉटेलजवळ धाड टाकून, कारमध्ये बसून आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तातेराव शिवाजी दंडीमे (वय ३४ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, निडेवन रोड, उदगीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

१५ मे २०२६ रोजी रात्री पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांचे पथक गस्तीवर होते. यादरम्यान, येरोळ मोड येथील एका हॉटेलजवळ मारुती सुझुकी स्वीफ्ट कारमध्ये एक इसम आयपीएल स्पर्धेतील ‘लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज’ या सामन्यावर पैसे लावून ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने रात्री १०:५० वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या ठिकाणी सापळा रचून संशयित मारुती स्वीफ्ट कारला (क्रमांक MH-55-B-0534) घेरले आणि कारमधील तातेराव दंडीमे याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीची आणि वाहनाची झडती घेतली असता, तो मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून थेट आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मारुती सुझुकी स्वीफ्ट कार, दोन Vivo कंपनीचे मोबाईल फोन, एक Acer कंपनीचा लॅपटॉप, सट्ट्याच्या हिशोबासाठी वापरण्यात येणाऱ्या डायऱ्या, कॅल्क्युलेटर आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी तातेराव दंडीमे विरुद्ध ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस करत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, अंमलदार तुळशीराम बरुरे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, अंजली गायकवाड तसेच शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे अंमलदार घाडगे व साठे यांच्या पथकाने केली आहे. लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी क्रिकेट सट्टा, ऑनलाईन जुगार व अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोटचा दहावीचा निकाल ९८.७९ टक्के

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
97
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
88
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोटचा दहावीचा निकाल ९८.७९ टक्के

ताज्या बातम्या

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In