• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

४३ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
४३ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अहमदपूर-नागठाणा मार्गावरील भीषण अपघातानंतर प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप

अहमदपूर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगाराची अहमदपूर-नागठाणा ही एसटी बस नागठाण्याहून ४३ प्रवासी घेऊन अहमदपूरकडे येत असताना लांजी आणि तांबडसांगवी गावादरम्यान भीषण अपघात झाला. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाला बाजू देताना बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बसमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. अपघात होताच परिसरातील शेतकरी आणि वाहनचालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर खाजगी वाहने, रुग्णवाहिका आणि शासकीय रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अरुंद रस्त्यामुळे दुर्घटना

बस चालक नारायण केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागठाण्याहून अहमदपूरकडे येत असताना समोरून एक टाटा ४०७ मालवाहू वाहन भरधाव वेगाने आले. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनाला जागा देण्यासाठी बस साईडपट्टीवर घेण्यात आली. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेली भुसभुशीत आणि कमकुवत साईडपट्टी बसचा भार सहन करू शकली नाही आणि बस थेट खाली घसरून पलटी झाली. अपघातानंतर संबंधित टेम्पो चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या लांजी-अंधोरी मार्गाची रुंदी केवळ १२ फूट असून ती वाढवून १५ फूट करण्याची मागणी ग्रामपंचायतीने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

“रस्ता अरुंद असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आजचा अपघात घडल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत या मार्गावर झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आता तरी जागे होऊन रस्त्याचे रुंदीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Bhimrao Kamble
Previous Post

लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

Next Post

मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू

मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In