• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंगणी तलावात मासेमारीची होडी उलटून दोन शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; धारूर तालुक्यावर शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
हिंगणी तलावात मासेमारीची होडी उलटून दोन शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; धारूर तालुक्यावर शोककळा
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

धारूर: तालुक्यातील हिंगणी येथील तलावात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या मुलींपैकी तिघीजण मासेमारीच्या होडीत बसल्या असता, अचानक होडी उलटून दोन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. पलक शामराव पारवे (वय १४, रा. हिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मृत मुलींची नावे आहेत. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेमुळे संपूर्ण हिंगणी परिसरावर मातमी कळा पसरली आहे.

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाच मुली तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे काठावर उभ्या असलेल्या मासेमारीच्या होडीवर केवळ कौतुकापोटी पलक, दिव्या आणि मोहिनी पारवे या तिघीजण बसल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने होडी अचानक उलटली आणि तिघीही खोल पाण्यात बुडू लागल्या. काठावरील लहान मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ तलावाकडे धाव घेतली.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

ग्रामस्थांनी तत्परतेने पाण्यात उड्या मारून तिन्ही मुलींना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. या थरारात मोहिनी पारवे हिला शुद्ध आली आणि ती सुदैवाने बचावली. मात्र, पलक आणि दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या निष्पाप चिमुरड्यांच्या अकाली जाण्याने मृत मुलींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Previous Post

हिंगोणी बु. येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामसभेचा तीव्र विरोध; भील समाजासाठी जागेची मागणी

Next Post

सरकारी रुग्णालयात ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरू; महिलांसाठी दिलासादायक पाऊल – आमदार संजना जाधव

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
2
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
1
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
6
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
1
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
22
Next Post
सरकारी रुग्णालयात ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरू; महिलांसाठी दिलासादायक पाऊल – आमदार संजना जाधव

सरकारी रुग्णालयात ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरू; महिलांसाठी दिलासादायक पाऊल – आमदार संजना जाधव

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In