• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाचे पाणी शिवारातच अडविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
पावसाचे पाणी शिवारातच अडविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

लातूर | प्रतिनिधी

गतवर्षी अहमदपूर तालुक्यात विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली असून, याच धर्तीवर यंदाही नदी-नाले खोलीकरण आणि बॅरेज परिसरातील सरळीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. आपल्या गावात पडणारे पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

अहमदपूर तालुक्यातील गुगदळ येथे महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभाग, नाम फाऊंडेशन, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नदी खोलीकरण व रुंदीकरण मोहिमेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सात गावांमध्ये नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना मंत्री श्री. पाटील म्हणाले की, “गावातील पाणी गावात आणि शिवारातील पाणी शिवारात जिरवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट घडवून आणण्याचा शासनाचा मानस आहे.”

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तम माने, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे, अश्विन नागराळे, भानुदास पोटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, गट विकास अधिकारी पंकज शेळके, सिद्धी शुगरचे कार्यकारी संचालक अविनाश जाधव, नाम फाऊंडेशनचे विलास चामे, टाटा मोटर्स फाऊंडेशनचे प्रमोद घायाळ आणि उत्तम सुरनर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहकार मंत्र्यांनी प्रत्येक गावात शोषखड्डे निर्माण करून भूजल पुनर्भरणाला चालना देण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायासारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत, माती परीक्षण करूनच खतांचा समतोल वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून दळणवळण, आरोग्य, घरकुल, दिवसा वीजपुरवठा आणि सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनीही जलसंधारणाच्या कामांबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

दरम्यान, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील थोडगाव येथील पाझर तलाव, शेणकुड, येस्तार आणि मावलगाव येथील बॅरेज कामांची पाहणी केली. तसेच गुगदळ येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

Previous Post

केशवराज मंदिरात पंचकुंडात्मक महाविष्णू याग; पवमान स्वाहाकार महायज्ञाचे आयोजन

Next Post

पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे – सिंदखेड गावातील महिलांची दैना

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे – सिंदखेड गावातील महिलांची दैना

पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे – सिंदखेड गावातील महिलांची दैना

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In