• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वहाळा बुद्रुक येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in क्राईम
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पातुर ग्रामीण प्रतिनिधी

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वहाळा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी एका मजूर कुटुंबाच्या घरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश जगदेव सौंदळे हे शनिवारी रात्री घराच्या स्लॅबवर झोपण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

विशेष म्हणजे, सौंदळे यांना काही दिवसांपूर्वीच घरकुल योजनेचा हप्ता मिळाला होता. त्यासाठी त्यांनी बँकेतून काढलेले सुमारे ७० हजार रुपये तसेच मजुरीतून साठवलेली रोकड घरात ठेवली होती. चोरट्यांनी हीच रक्कम लक्ष्य केल्याने हे मजूर कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.

चोरी करताना चोरट्यांनी अत्यंत चलाखीने घराबाहेरील लाईट बंद केली होती. तसेच शेजारी राहणाऱ्या त्यांच्या भावाच्या घरालाही बाहेरून कडी लावल्याने चोरीदरम्यान कोणालाही संशय आला नाही.

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंगेश सौंदळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: Pradip Tajne
Previous Post

सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसा; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Next Post

राजमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक आर. सी. बाफना गोशाळेत संपन्न

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
97
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
88
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post
राजमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक आर. सी. बाफना गोशाळेत संपन्न

राजमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक आर. सी. बाफना गोशाळेत संपन्न

ताज्या बातम्या

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In