• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

बंजारा तांड्यातील सिमेंट रोड व नाली बांधकामावर नागरिकांचा संताप; निकृष्ट काम तात्काळ बंद करण्याची मागणी

उमरखेड प्रतिनिधी

उमरखेड शहरातील बंजारा तांडा परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रोड, ट्रेन लादीकरण व नाली बांधकामातील कथित गैरव्यवहारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल ४० लाख रुपयांच्या मंजूर निधीच्या कामात निकृष्ट साहित्य वापरून बोगस पद्धतीने काम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

सदर कामाचा कालावधी १८० दिवसांचा असून अंतिम मुदत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बांधकामात जुने व गंजलेले स्टील, नाल्यातील रेती, माती तसेच निकृष्ट दर्जाचे मिश्रण वापरले जात आहे. त्यामुळे भविष्यात रस्ता व नालीचे बांधकाम तडे जाणे किंवा कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराला “काम इस्टिमेटप्रमाणे आणि दर्जेदार करा, अन्यथा काम बंद करा,” अशी मागणी केली असता ठेकेदाराने दादागिरीची भाषा वापरत शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, घटनास्थळी संबंधित अभियंता श्री. कुबडे उपस्थित असतानाही कथितरीत्या नियमबाह्य काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे “प्रशासनाच्या डोळ्यादेखत निकृष्ट काम सुरू आहे का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दारासिंग रुडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. स्वतंत्र तांत्रिक समिती नेमून कामाचा दर्जा तपासावा, चौकशी पूर्ण होईपर्यंत काम थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता नगर परिषद प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे उमरखेड शहराचे लक्ष लागले आहे.

Tags: Pravin ingle
Previous Post

राजमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक आर. सी. बाफना गोशाळेत संपन्न

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
59
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
33
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In