• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदिवासी भागात शिक्षणाची ‘ज्ञानरचना’; विक्रमगडच्या पहिल्या इंग्रजी शाळेचा १०० टक्के निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदिवासी भागात शिक्षणाची ‘ज्ञानरचना’; विक्रमगडच्या पहिल्या इंग्रजी शाळेचा १०० टक्के निकाल
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी – विक्रमगड

पालघर जिल्ह्यातील विक्रमगडसारख्या आदिवासी तालुक्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने २०१५ मध्ये सुरू झालेल्या चिंचघर येथील ज्ञानरचना इंग्रजी शाळेने यंदा इतिहास घडवला आहे. शाळेच्या दहावीच्या पहिल्याच तुकडीने शंभर टक्के निकालाची नोंद करत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी सात विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. विशेष म्हणजे विक्रमगड तालुक्यातील संपूर्ण इंग्रजी माध्यमातील ही पहिली शाळा मानली जाते.

ज्ञानरचना एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चालविण्यात येणारी ही शाळा पूर्णपणे खासगी विनाअनुदानित स्वरूपात कार्यरत आहे. अवघ्या ११ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेने आज ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे. अनेक विद्यार्थी दररोज ८ ते १० किलोमीटरचा प्रवास करून शिक्षणासाठी शाळेत येतात.

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी रविवारी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला केवळ ज्ञानरचना शाळेचेच नव्हे तर पंचक्रोशीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेत केंद्रीय जीएसटी कार्यालयातील अधीक्षक सोमयाजी नारायणन, समुपदेशक मानसशास्त्रज्ञ डॉ. मानसी आमडेकर, कोकुयो रिद्धी प्रा. लि. चे संचालक कमल पारेख तसेच मो. ह. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक संदीप आडारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, विविध क्षेत्रांतील संधी, स्पर्धा परीक्षा, सैन्यदल, फार्मसी, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करताना तज्ज्ञांनी आत्मविश्वास, सातत्य आणि योग्य दिशा यांचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. सुहास पाटील यांनी केले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचना इंग्रजी शाळेचे कार्य प्रेरणादायी ठरत असून, शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी वाट खुली होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Sharad Dive
Previous Post

लासलगाव कांदा बाजारात दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

Next Post

समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा एल्गार; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अंबादास दानवे यांचा ‘चक्काजाम’

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
48
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
18
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा एल्गार; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अंबादास दानवे यांचा ‘चक्काजाम’

समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा एल्गार; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अंबादास दानवे यांचा ‘चक्काजाम’

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In