• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेवटच्या श्वासापर्यंत सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही; धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा एल्गार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेवटच्या श्वासापर्यंत सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही; धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा एल्गार
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

| गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ, एमआयडीसी आणि इतर प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या विरोधात आज हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत “माती ही आमची माय आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तिचे रक्षण करू,” असा निर्धार व्यक्त केला.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रस्तावित विमानतळासाठी गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून, स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विरोध असूनही प्रशासनाकडून बळजबरीने प्रक्रिया राबवली जात आहे.

तसेच चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १४ गावांतील जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या बैठकीत जमिनी घेणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही संबंधित गावांतील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही, तर ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी डॉ. नामदेव किरसान यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे,” असे सांगितले.

या आंदोलनात विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, महिला, युवक आणि हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

गडचिरोलीत थरार! अमीर्झा रोडवर हत्तीचा धुमाकूळ; दुचाकीस्वारांची पळापळ

Next Post

गडचिरोलीत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरातून मिनी प्रिंटिंग प्रेस जप्त

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
12
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
10
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
32
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
15
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
29
Next Post

गडचिरोलीत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरातून मिनी प्रिंटिंग प्रेस जप्त

ताज्या बातम्या

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In