• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरातून मिनी प्रिंटिंग प्रेस जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in क्राईम
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

दोन उच्चशिक्षित सख्ख्या भावांसह चौघांना अटक; ६ दिवसांची पोलीस कोठडी

गडचिरोली | प्रतिनिधी

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली शहरात एटीएम मशीनने शंभराच्या बनावट नोटा नाकारल्यानंतर एका मोठ्या आंतरजिल्हा बनावट नोटांच्या रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत थेट नागपूर येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या मिनी प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकली. या कारवाईत दोन उच्चशिक्षित सख्ख्या भावांसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली शहरातील एका एटीएम मशीनमध्ये काही व्यक्ती पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मशीनने शंभराच्या काही नोटा बनावट असल्याने त्या स्वीकारण्यास नकार दिला. हा प्रकार लक्षात येताच बँक प्रशासनाने तातडीने गडचिरोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या नोटा नागपूर येथून छापून आणण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी नागपुरातील संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात ५०, १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, अत्याधुनिक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, नोटा कापण्याचे साहित्य आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली.

या रॅकेटमध्ये मयूर डोईजड आणि आदित्य डोईजड या दोन सख्ख्या भावांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एक जण सिव्हिल इंजिनिअर असून दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. हे दोघे गेल्या चार वर्षांपासून बनावट नोटा छापून बाजारात चलनात आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमधून आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात फिरवल्या गेल्या आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

शेवटच्या श्वासापर्यंत सुपीक शेतजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही; धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा एल्गार

Next Post

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
97
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
88
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

ताज्या बातम्या

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In