• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंठा तालुक्यात खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंठा तालुक्यात खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट?
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

संभाजी ब्रिगेडचे कृषी विभागाला निवेदन; साठेबाजी, जादा दरवाढ व कागदावरील पावत्यांप्रकरणी कारवाईची मागणी

मंठा | प्रतिनिधी

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

मंठा तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक कृषी सेवा केंद्रांकडून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेड, मंठा यांच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, मंठा यांना सविस्तर निवेदन देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या निवेदनानुसार, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांकडून शासनाने निश्चित केलेल्या एमआरपीपेक्षा जादा दराने खत विक्री केली जात आहे. काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत असून “खतांचा साठा कमी आहे” तसेच “पुढे दर आणखी वाढणार आहेत” अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दराने खत खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच अनेक कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना अधिकृत संगणकीय जीएसटी बिल न देता साध्या कागदावर पावत्या दिल्या जात असल्याची बाबही समोर आली आहे. काही ठिकाणी कोणतीही पावती दिली जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय खत खरेदीसोबत इतर साहित्य घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडने तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची संयुक्त तपासणी करून खतसाठा, खरेदी-विक्री नोंदी व बिलिंग प्रणालीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अधिकृत जीएसटी बिल न देणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच साठेबाजी करणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रशासनाने येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र जनआंदोलन, धरणे आंदोलन व घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष बालासाहेब भगवान खवणे यांनी दिला आहे.

यावेळी आसाराम झोल, गजानन गायकवाड, अशोक हिवाळे, बाळासाहेब सोळंके, सतीश आवचार, शिवाजी जाधव, सचिन गबाळे, गजानन राठोड, संजय चव्हाण, धोंडीराम घोरसड आदी उपस्थित होते.

Previous Post

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Next Post

पुण्यात भरदिवसा गोळीबार; बाळा मस्केची निर्घृण हत्या

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
22
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
10
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
46
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
16
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
29
Next Post

पुण्यात भरदिवसा गोळीबार; बाळा मस्केची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In