• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रलंबित प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; शिवसेना उबाठाचा आजरा तहसीलदारांना इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रलंबित प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; शिवसेना उबाठाचा आजरा तहसीलदारांना इशारा
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

संकेश्वर ते बांदा मार्गावरील आजरा एमआयडीसीजवळ सुरू होत असलेल्या टोल वसुलीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची लेखी उत्तरे मिळाल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही, असा आक्रमक इशारा देत शिवसेनेच्या वतीने आजरा तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

निवेदनात टोल प्रशासन आणि संबंधित विभागाला विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. संकेश्वर-बांदा मार्गावरील टोल वसुलीत आजरा तालुक्यातील खाजगी व व्यावसायिक वाहनधारकांना टोलमाफी कोणत्या निकषांवर आणि किती वर्षांसाठी दिली जाणार, याबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगत असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील संभाजी चौकात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या समस्येवर प्रशासन कोणती उपाययोजना करणार, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

टोल सुरू करण्याच्या हालचाली वेगात सुरू असताना अनेक गावांमध्ये अद्याप बसथांबे उभारण्यात आलेले नाहीत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा टोल नाका किटवडे येथे स्थलांतरित करण्याबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

याशिवाय आजरा साखर कारखान्याच्या कामगारांची वाहने तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमधून पूर्ण माफी देण्यात येणार का, याबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने वरील सर्व प्रश्नांबाबत तातडीने लेखी माहिती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून टोलचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, दिनेश कांबळे, सुयश पाटील, चंदर पाटील, संजय येसादे, समीर चांद, शिवाजी आढाव, बिलाल लतीफ, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

८ पीएसआयना पदोन्नती; जिल्ह्याबाहेर बदली

Next Post

कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
4
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
17
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा

कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In