• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकलूजमधील १०७० झोपडपट्टीवासीयांसाठी दिलासादायक निर्णय; घरांच्या नियमितीकरणाला गती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

सोलापूर प्रतिनिधी

अकलूजमधील १०७० झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या घरांच्या नियमितीकरण प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य शासनाच्या १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या धोरणानुसार पात्र नागरिकांना कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

नगरसेविका सौ. दिपालीताई वाघमोडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १०७० झोपडपट्टी परिसरातील ७४ पात्र लाभार्थ्यांचा अतिक्रमण नियमितीकरणाचा परिपूर्ण प्रस्ताव अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या घराचा कायदेशीर मालकी हक्क मिळणार असून, घरकुल योजना, पाणी, वीज यांसारख्या शासकीय सुविधांचा अधिकृत लाभ घेणे शक्य होणार आहे. तसेच बेघर होण्याची भीतीही दूर होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी नगरसेविका सौ. जयश्रीताई एकतपुरे, नगरपरिषद गटनेते राहुल लोंढे, भारतीय जनता पार्टी अकलूज शहर सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने, भाजप चिटणीस संतोष वाघमोडे आदी उपस्थित होते.

“अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या १०७० झोपडपट्टीतील बांधवांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,” असे मत नगरसेविका सौ. दिपालीताई वाघमोडे यांनी व्यक्त केले.

या सकारात्मक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Previous Post

“संकल्प ते सिद्दी “या देशव्यापी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र भाजपच्या वतीने आमदार विक्रम पाचपुते यांची प्रदेश सहसंयोजक पदी निवड

Next Post

लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा घणाघात; उदगीरमध्ये ७.४२ लाखांचा २४ किलो गांजा जप्त, एक जण अटकेत.

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
50
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
19
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा घणाघात; उदगीरमध्ये ७.४२ लाखांचा २४ किलो गांजा जप्त, एक जण अटकेत.

लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा घणाघात; उदगीरमध्ये ७.४२ लाखांचा २४ किलो गांजा जप्त, एक जण अटकेत.

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In