• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“शेतकरी हा देशाचा कणा; त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या” – माजी मंत्री आ. संजय बनसोडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
“शेतकरी हा देशाचा कणा; त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या” – माजी मंत्री आ. संजय बनसोडे
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

उदगीर-जळकोट मतदारसंघातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांचा आढावा

उदगीर प्रतिनिधी

“शेतकरी हा देशाचा कणा असून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा, सिंचन व्यवस्था आणि पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असे स्पष्ट मत माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

उदगीर शहरातील पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम २०२६ च्या अनुषंगाने आयोजित पूर्वनियोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. उदगीर-जळकोट मतदारसंघातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, गटनेते रामचंद्र तिरुके, जि.प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी, दिलीपकुमार मटके, मुकेश भालेराव, उषा भुजबळे, पंचायत समिती सभापती वनमाला मरलापल्ले, जळकोट नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्षा मन्मथ किडे, उपसभापती बापुसाहेब भोसले, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी संदीप वालकुंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत कृषी, महसूल, वीज वितरण, सिंचन, खत व बियाणे पुरवठा तसेच पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खरीप हंगामासाठी आवश्यक खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य योग्य दरात उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.

“खत व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक पिळवणूक होऊ देऊ नका,” असे निर्देश आ. संजय बनसोडे यांनी दिले.

यावेळी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीवरही चर्चा करण्यात आली. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच कृषी विभागाने गावागावांत जनजागृती मोहीम राबवून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, असेही सूचित करण्यात आले.

बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित विभागांनी दिले. आगामी खरीप हंगामासाठी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सकारात्मक समन्वय निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Vilas Patil
Previous Post

लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा घणाघात; उदगीरमध्ये ७.४२ लाखांचा २४ किलो गांजा जप्त, एक जण अटकेत.

Next Post

साक्री तालुक्यात इंधनासाठी झुंबड; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
36
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
15
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
53
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
16
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
साक्री तालुक्यात इंधनासाठी झुंबड; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा

साक्री तालुक्यात इंधनासाठी झुंबड; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In