• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; ब्रम्हपुरी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; ब्रम्हपुरी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी | ता. १९ मे २०२६

देशात लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, अन्यथा अशा जनगणनेला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात ब्रम्हपुरी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

निवेदनात म्हटले आहे की, देशातील ओबीसी समाज हा मोठा सामाजिक घटक असूनही आजपर्यंत त्यांच्या अचूक लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय योजनांचे योग्य नियोजन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र जनगणना आकडेवारी अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

तसेच भारताच्या संविधानाने सर्व समाजघटकांना समान न्याय व प्रतिनिधित्वाचा अधिकार दिलेला असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवणे ही सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला बाधा पोहोचवणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. भविष्यात आरक्षण, शासकीय योजना, निधी वाटप तसेच विविध विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भूमिकाही काँग्रेस ओबीसी सेलने मांडली.

आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून स्वतंत्र ओबीसी जनगणना करण्यात यावी, अशी ठाम मागणी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली. अन्यथा अशा अपूर्ण जनगणनेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

शासन स्तरावर ही मागणी तातडीने पाठवून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी विनंती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राकेश पडोळे, कार्याध्यक्ष वामन मिसार, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, नगराध्यक्ष योगेश मिसार, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रदेश काँग्रेस सचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

साक्री तालुक्यात इंधनासाठी झुंबड; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा

Next Post

सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याविरोधात गडचिरोलीत हजारो शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
36
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
15
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
53
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
16
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याविरोधात गडचिरोलीत हजारो शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याविरोधात गडचिरोलीत हजारो शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In