• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेर-दारव्हा रोडवरच एमआयडीसी उभारावी; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
नेर-दारव्हा रोडवरच एमआयडीसी उभारावी; भाजपचे तहसीलदारांना निवेदन
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

नेर प्रतिनिधी:
तालुक्यात प्रस्तावित मिनी एमआयडीसी वटफळी-वटफळा परिसरात न करता नेर-दारव्हा रोडलगत उभारण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच वटफळी परिसरातील जमिनींचा तातडीने स्पॉट पंचनामा करण्याची मागणीही करण्यात आली.

भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नेर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर-दारव्हा रोडवरील जागेवर सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते एमआयडीसीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी तालुक्याच्या औद्योगिक विकासाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता काही प्रभावशाली उद्योजकांनी वटफळी-वटफळा परिसरातील जमिनी अत्यल्प दरात खरेदी करून स्वतःच्या फायद्यासाठी एमआयडीसीचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

गैरव्यवहाराचा आरोप

काही जमीन व्यवहारांमध्ये वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सातबारा उताऱ्यावर विहिरी, संत्रा लागवड व इतर नोंदी दाखवून शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित जमिनींची प्रत्यक्ष पाहणी करून स्पॉट पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनाचा इशारा

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

यावेळी निलेश राठोड कारभारी, अनिल राठोड, राहुल यादव, आशिष खोडे, प्रकाश यादव, अरुण यादव, प्रीतम गावंडे, ओम यादव, अजय भोयर, उमेश बडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Vijay Baraskar
Previous Post

प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयात बालसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

Next Post

अधिक मासानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
अधिक मासानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन

अधिक मासानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In