• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोगदे-चंद्रगाव येथे अवतार कुळ परिवार मेळावा २०२६ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोगदे-चंद्रगाव येथे अवतार कुळ परिवार मेळावा २०२६ उत्साहात संपन्न
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

पालघर प्रतिनिधी :

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कोगदे-चंद्रगाव येथे अवतार कुळ परिवार मेळावा २०२६ मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र, गुजरात तसेच दादरा आणि नगर हवेली येथील अवतार कुळ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. परिवारातील ऐक्य, सामाजिक-सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि शैक्षणिक प्रगती हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

मेळाव्याची सुरुवात कुलदेवतेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर कुलदेवतेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत डोक्यावर गौरी घेऊन सांबळ नृत्य आणि तारपा नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली येथील सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कोगदे परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. शांताराम घेगड, गणपत भोये, विजय भुसारा, नारायण घेगड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश भोये, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी घुटे साहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. परिवारातील सुमारे २८ ते ३० गावांमधील पाचशे ते सातशे नागरिकांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.

यावेळी दहावी-बारावी, नीट परीक्षा, नवोदय व एकलव्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सरळ सेवा भरतीत निवड झालेले उमेदवार, सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.

मेळाव्यात परिवाराच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक सांबळ आणि तारपा नृत्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक रंगत प्राप्त झाली.

मेळाव्याचे अध्यक्षपद सखाराम सोमा अवतार (कापराडा, गुजरात) यांनी भूषविले. सचिव म्हणून गोविंद रामा अवतार (कोगदे), खजिनदार म्हणून यदुनाथ भिवा अवतार (देवगाव), सहसचिव संतोष बाळू अवतार (आळ्यांचीमेट) तर उपाध्यक्ष म्हणून राजाराम गोपाळ अवतार, प्रकाश अवतार आणि राघो रामा अवतार यांनी जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यदुनाथ अवतार यांनी केले. सूत्रसंचालन संतोष अवतार यांनी तर आभार प्रदर्शन आणि निरोप समारंभ कैलास अवतार यांनी पार पाडला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags: Saurabh Kamdi
Previous Post

दुघाळा येथे भीषण आग; शेतकरी दिवाकर पवार यांचा संसार जळून खाक

Next Post

पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
21
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
27
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
12
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
9
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
13
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
135
Next Post
पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी

पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In