• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारीसाठी रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारीसाठी रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत
0
SHARES
105
VIEWS
Ad 1
Ad 1

बीड-लातूर-धाराशिव मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांनी रमेश आडसकरांना संधी दिल्यास पक्षाला फायदा होणार?

बीड/प्रतिनिधी

बीड-लातूर-धाराशिव स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू आणि जनसामान्यांमध्ये मजबूत संपर्क असलेले रमेश आडसकर यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य, तिन्ही जिल्ह्यांतील मजबूत जनसंपर्क आणि सर्वपक्षीय स्नेहसंबंध या बळावर रमेश आडसकर यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे.

RelatedPosts

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या रमेश आडसकर यांनी गेली तीन दशके जिल्हा परिषद राजकारणापासून ते सहकार आणि शिक्षण क्षेत्रापर्यंत सातत्याने काम करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बंधू मेघराज आडसकर यांच्या सहकार्याने त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्याची भक्कम पायाभरणी केली.

रमेश आडसकर यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे लोकांशी असलेला थेट संवाद. कोणतेही मोठे पद नसतानाही सामान्य माणसांची कामे पूर्णत्वाकडे नेण्याची त्यांची कार्यशैली आजही ग्रामीण भागात चर्चेचा विषय आहे. माजलगाव, केज, परळीसह बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये त्यांचा प्रभाव असून धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यापर्यंत त्यांनी शैक्षणिक कार्याचा विस्तार केला आहे.

बदलत्या शैक्षणिक पद्धतीनुसार ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी सीबीएसई पॅटर्नच्या इंग्रजी शाळा सुरू करत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. पन्नासहून अधिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सहकारासोबत शिक्षण क्षेत्रातही त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.

मागील विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्या निवडणुकीत महायुतीच्या पाठबळावर भाजपचे सुरेश धस यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीच्या पारंपरिक मानल्या जाणाऱ्या जागेवर कब्जा केला होता. त्यामुळे यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. विशेषतः स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असावा अशी भूमिका घेतली होती. मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिले. आता त्याच स्वप्नाला पूर्णत्व देण्यासाठी सक्षम आणि सर्वमान्य चेहरा म्हणून रमेश आडसकर यांच्याकडे पाहिले जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, बीड-लातूर-धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे संख्याबळ प्रभावी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील समन्वय साधला गेला तर रमेश आडसकर यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार या मराठवाड्याशी भावनिक नाळ जुळलेल्या नेत्या म्हणून पाहिल्या जातात. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आडसकरांसारख्या जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

केज मतदारसंघ हा आडसकर कुटुंबियांचा प्रभाव असलेला भाग मानला जातो. तसेच परळी, माजलगाव, गेवराई या भागांमध्येही त्यांचे मजबूत संपर्क आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याशी असलेले स्नेहसंबंध आणि विविध पक्षांतील स्थानिक नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध हे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

रमेश आडसकर यांचे पुतणे तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर यांनीही मागील काही वर्षांत युवकांमध्ये मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे आडसकर कुटुंबाचा वाढता सामाजिक आणि राजकीय प्रभाव या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण हे देखील आडसकर यांच्या कार्यशैलीशी परिचित आहेत. पक्षनिष्ठा, संघटन क्षमता आणि सर्वसामान्यांमधील स्वीकारार्हता लक्षात घेता त्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे आडसकरांच्या नावासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

एकंदरीत बीड-लातूर-धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांच्या राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक समीकरणांचा विचार करता रमेश आडसकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. आता सुनेत्राताई पवार यांचा निर्णय काय होणार याकडे तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

Next Post

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

Related Posts

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
Blog

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

November 21, 2026
16
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी
Blog

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
5
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
10
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
10
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
9
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
101
Next Post
NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

ताज्या बातम्या

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026
केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

November 21, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In