• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू
0
SHARES
184
VIEWS
Ad 1

चंद्रपूर/प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या १३ महिलांवर वाघाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही परिसरातील महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी महिला सैरावैरा पळू लागल्या आणि मदतीसाठी आक्रोश करू लागल्या. मात्र जंगल परिसर असल्याने त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाने अत्यंत आक्रमकपणे काही महिलांवर सलग हल्ले केले. या हल्ल्यात कवडूबाई दादाजी मोहुर्ले, अनुबाई दादाजी मोहुर्ले, सुनिता कौशिक मोहुर्ले आणि संगीता संतोष चौधरी या चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित महिलांनी कसाबसा जीव वाचवत जंगलातून बाहेर पडण्यात यश मिळवले.

या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जंगलात उपजीविकेसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, चार महिलांचे बळी घेणाऱ्या या कथित “आदमखोर” वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. वन अधिकाऱ्यांची पथके परिसरात तैनात करण्यात आली असून, नागरिकांना जंगल परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे मावळपर्यंत; १७ वा आरोपी निष्पन्न

Next Post

प्रकल्प दोडामार्गात, वीज मात्र दुसऱ्या राज्यात! कराराअभावी ऐन पावसाळ्यात तालुका अंधारात जाण्याची भीती

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

प्रकल्प दोडामार्गात, वीज मात्र दुसऱ्या राज्यात! कराराअभावी ऐन पावसाळ्यात तालुका अंधारात जाण्याची भीती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In