• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रकल्प दोडामार्गात, वीज मात्र दुसऱ्या राज्यात! कराराअभावी ऐन पावसाळ्यात तालुका अंधारात जाण्याची भीती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

दोडामार्ग/प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यात उभारण्यात आलेल्या ‘महालक्ष्मी विद्युत प्रकल्पा’ची वीज सध्या तालुक्यालाच मिळत नसून ती दुसऱ्या राज्याला पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरण आणि प्रकल्प प्रशासन यांच्यातील करार संपून तब्बल तीन वर्षे उलटूनही तो अद्याप पूर्ववत न झाल्याने आगामी पावसाळ्यात संपूर्ण दोडामार्ग तालुका अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशीच परिस्थिती सध्या दोडामार्गवासीयांची झाली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सध्या दोडामार्ग तालुक्यातील सासोली सबस्टेशनला ३३ केव्ही इन्सुली लाईनवरून वीजपुरवठा केला जातो. मात्र ही लाईन अत्यंत कुचकामी ठरत असून साधा वारा, पाऊस किंवा विजांचा कडकडाट झाला तरी लाईन तत्काळ ट्रिप होते. परिणामी संपूर्ण तालुक्याला तासनतास अंधाराचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते.

यापूर्वी महालक्ष्मी विद्युत प्रकल्पातून दोडामार्ग तालुक्याला सुरळीत वीजपुरवठा केला जात होता. मात्र महावितरण आणि प्रकल्प प्रशासनातील करार संपुष्टात आल्यानंतर गेली तीन वर्षे हा प्रश्न रखडलेलाच आहे. प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वतःच्या तालुक्यात प्रकल्प असूनही येथील नागरिकांना विजेपासून वंचित राहावे लागत असून, इथली वीज मात्र दुसऱ्या राज्याला विकली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत महालक्ष्मी प्रकल्पातून तात्पुरता वीजपुरवठा देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्वी मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात तालुक्यात अंधार पडल्यानंतर संबंधित अधिकारी मोबाईल ‘स्विच ऑफ’ करून ठेवतात किंवा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाळा तोंडावर असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोडामार्गचे तहसीलदार, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून महावितरण आणि महालक्ष्मी प्रकल्प प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन वीज करार पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा ऐन पावसाळ्यात दोडामार्ग तालुक्याला कायमस्वरूपी अंधाराचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू

Next Post

नरहरी राजनगाव ते पेहरकर वस्ती रस्त्याच्या कामास सुरुवात; ग्रामस्थांमध्ये समाधान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

नरहरी राजनगाव ते पेहरकर वस्ती रस्त्याच्या कामास सुरुवात; ग्रामस्थांमध्ये समाधान

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In